रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणाऱ्या आणि शहराचा विकासात्मक चेहरा बदलणाऱ्या विविध महत्त्वाच्या विकासकामांची आज जिल्हा पालकमंत्री श्री. उदय सामंत यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
पालकमंत्र्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या सुधारणा, आधुनिक फुटपाथ बांधणी, रस्ते रुंदीकरण आणि इतर सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली. कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रत्येक काम दर्जेदार, टिकाऊ आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना कठोर सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी सरकार कटिबद्ध; उदय सामंत यांची जागेवर पाहणी



