दोडामार्ग : ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात

konkan varta image (1)

दोडामार्ग तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत हे रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल होईल, अशी ग्वाही आमदार दीपक केसरकर यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी रुग्णालयाच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व अभियंत्यांशी चर्चा करताना ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंजूर केल्याचे सांगून केसरकर यांनी त्यांचे आभार मानले. या रुग्णालयामुळे तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी गोवा किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही; सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा, आधुनिक उपकरणे आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top