देवगड तालुक्यातील मोंड येथील पोलीस पाटील जितेंद्र सुधाकर राणे यांना विविध फौजदारी गुन्ह्यांमुळे निलंबित करण्यात आले आहे. सार्वजनिक शांतता भंग, कायदा व सुव्यवस्था, धमकी, मारहाण, बेकायदेशीर जमाव आणि शासकीय कामात अडथळा यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने कणकवली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ च्या कलम ११ अन्वये त्यांना पदावरून निलंबित केले.
पोलीस अहवाल, गुन्ह्यांचा तपशील आणि अभिलेखांच्या परीक्षणानंतर ही कारवाई करण्यात आली असून, पदावर राहिल्यास साक्षीदारांवर प्रभाव, प्रशासनावर दबाव आणि जनतेचा विश्वास कमी होण्याची शक्यता गृहीत धरली आहे.


