मालवण आगारात विकासाची नवी भर पडली आहे. आमदार मा. निलेश राणे साहेबांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले असून, मालवण आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ नावाच्या ५ नवीन एसटी बसेस आज दाखल झाल्या आहेत. या नव्या बसेसमुळे मालवण परिसरातील सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर होणार आहे.
या महत्त्वाच्या उपक्रमासाठी दीर्घकाळ पाठपुरावा करणारे मालवण-कुडाळ मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश नारायणराव राणे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या प्रयत्नांमुळे मालवण आगाराला ही भक्कम भर पडली आहे. याबरोबरच, नव्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.
मालवण आगार विकासाच्या वाटेवर आणखी एक भक्कम झेप घेत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने काम करणाऱ्या आमदार निलेश राणे साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या या प्रयत्नांचे मालवणकर मनापासून स्वागत करत आहेत.



