रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजप परिवाराचे अत्याधुनिक, सुसज्ज आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी कार्यालय उभारण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. या संकल्पानुसार रत्नागिरी येथे बांधकाम सुरू असलेल्या नवीन जिल्हा कार्यालयाची पाहणी भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र दादा चव्हाण यांनी केली.
या कार्यालयामुळे पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बळकटी आणि जनसेवेची प्रेरणा यांचा संगम होईल. आधुनिक सुविधा, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि कार्यकर्त्यांच्या संवादासाठी सक्षम वातावरण यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण
यावेळी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या प्रेरणादायी आवाहनाला प्रतिसाद देत नवीन कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि मातृऋणाची जाणीव यांचा सुंदर मेळ घालणारा हा उपक्रम प्रत्येकाने स्वीकारावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
उपस्थित मान्यवर
याप्रसंगी प्रदेश कोंकण पदवीधर आमदार श्री. निरंजन डावखरे, सरचिटणीस आमदार श्री. योगेश सागर, प्रदेश सचिव आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आमदार श्री. प्रमोद जठार, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मोरे, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत यादव, माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर, भाजप महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



