मुनग्याच्या ग्रामस्थांनी पकडून काढले सर्व बॅनर
देवगड (कोकण वार्ता): पूर्ण देवगड तालुक्यात रात्रीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बातमीचे बॅनर लावण्याचा प्रकार समोर आला आहे. मुणगे गावातील जागरूक ग्रामस्थांनी रात्री उशिरा या प्रकाराला थेट विरोध केला. बॅनर लावणाऱ्या व्यक्तींना पकडून त्यांच्याकडून सर्व बॅनर काढून घेण्यात आले.
ग्रामस्थांनी सांगितले की, “संपूर्ण देवगडात बॅनर लावून आले पण जेव्हा ते आई भगवतीच्या दारात पोहोचले, तेव्हा त्यांना शिक्षा झाली.” गावातील सर्व मंडळी घटनास्थळी धावून आली आणि एकत्रितपणे या प्रकाराला विरोध दर्शवला.
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



