किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम

top news channel in konkan, konkan news, Konkan news channel, malvan news

मालवण : लायन्स क्लब मालवण आणि मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले राजकोट येथे सामाजिक उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम उत्साहात पार पडली. यावेळी क्लबचे सेक्रेटरी पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, जयश्री हडकर, रूपा कांदळगांवकर, बाबल कवठकर, नगरपरिषद मुकादम आनंद वळंजु, बाळकृष्ण जाधव व इतर नगरपरिषद कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.

लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून किल्ले राजकोट येथे ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमीमुळे किल्ले राजकोटचा परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर झाला आहे.

फोटो : उदय बापर्डेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top