आचरा (जि. सिंधुदुर्ग ), दि. ०६ जून २०२६: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आचरा गाऊडवाडी येथे ग्रामपंचायत आचरा यांच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात विविध प्रकारची फलझाडे, औषधी झाडे व सावलीची झाडे लावण्यात आली.
कार्यक्रमाला माननीय सरपंच श्री. जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच श्री. संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्या सौ. श्रुती सावंत, सौ. किशोरी आचरेकर, कृषी सहाय्यक श्री. राधेश्याम डाखोरे, अंगणवाडी सेविका सौ. रक्षा पाटील, मदतनीस सौ. आचरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. अभय भोसले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.



