मालवण: मालवण नगरपरिषद क्षेत्रात महत्वपूर्ण विकासकामाला गती मिळाली आहे. नमो उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या महत्त्वाच्या विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. भूमिपूजन करत त्यांनी विकासकामाचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, बांधकाम सभापती श्री. सहदेव बापार्डेकर, मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्यासह सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
नमो उद्यानाच्या विकासामुळे मालवणकरांना आधुनिक सुविधायुक्त उद्यान उपलब्ध होणार असून, येथे पर्यटन, व्यायाम, बालक्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उत्तम व्यवस्था होईल. हा प्रकल्प मालवणच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घालणार आहे.
मालवण नगरपरिषदेच्या नमो उद्यान विकासकामाचा भूमिपूजन सोहळा; आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न



