किल्ले सिंधुदुर्ग : दोन नंबर बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले

top news channel in konkan, konkan news, Konkan news channel, malvan news

लवकरात लवकर कोसळलेला भाग पूर्ववत करण्याची मागणी

मालवण : उदय बापर्डेकर

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दोन नंबर बुरुजाच्या पायथ्याच्या बाजूचे काही दगड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याच्या संरक्षणाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

किल्ल्याच्या दोन नंबर बुरुजाच्या पायथ्याशी सुमारे ४ ते ५ फूट रुंदीच्या भागातील दगड कोसळले आहेत. या घटनेची माहिती पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आली असून, वरिष्ठ कार्यालयाला याची कल्पना देण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

किल्ले रहिवासी मंगेश सावंत यांनी याबाबतची माहिती दिली. पावसाळी कालावधी असल्याने सध्या किल्ल्यावर पर्यटकांसाठी होडी सेवा बंद आहे. अशा परिस्थितीत बुरुजाच्या पायथ्याचा हा भाग कोसळल्याने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर कोसळलेला भाग पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि जाणकारांकडून करण्यात येत आहे.

पुरातत्त्व विभागाकडून येत्या काही दिवसांत पाहणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top