सान्वी विष्णू कुबल : एकाच वर्षात दुसऱ्यांदा इस्रो सफरीसाठी निवड!

konkan varta image (3)

सिंधुदुर्ग : हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा, आचरे पिरावाडी येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी सान्वी विष्णू कुबल हिला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या शैक्षणिक सफरीसाठी दुसऱ्यांदा निवडण्यात आले आहे. एकाच वर्षात दुसऱ्या वेळी ही अभिमानास्पद संधी मिळवणारी सान्वी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

या सफरीसाठी सिंधुदुर्ग ते मैसूर विमान प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही विशेष सफर विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, रॉकेट तंत्रज्ञान, उपग्रह प्रणाली आणि भारताच्या अवकाश मोहिमांबद्दल प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून देणारी आहे.

सफरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…

इस्रो सफरीसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🚀

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top