कोकणात २ महिने मासेमारी बंद!

konkan varta image

कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै मासेमारीवर पूर्ण बंदी

मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, माशांच्या प्रजनन आणि सागरी मत्स्यसंपत्तीच्या संवर्धनासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात यांत्रिक आणि मोठ्या नौकांसाठी पूर्णपणे मासेमारी बंद राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.

मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी लावल्या असून, समुद्रात जाणे टाळले आहे. हा ६१ दिवसांचा बंदी कालावधी पर्यावरण संरक्षण आणि दीर्घकालीन मत्स्यव्यवसायासाठी उपयुक्त मानला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top